दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
सातारा :-टाळगाव ( ता . कराड ) येथे दिवानदरा नावाच्या शिवारात चरावयास गेलेल्या गीर गाईच्या कळपावर सोमवारी दुपारी दिवसा हल्ला करून वासरू ठार केले . यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून चरावयास गेलेल्या जनावर बिबट्या हल्ला करत असल्याने शेतकरी हातबल झाला आहे . कराड दक्षिणच्या डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय चालतो . या विभागात घरटी दोन ते चार जनावरे असून ही सर्व जनावरे डोंगर शिवारात चरावयास सोडली जातात . परंतु सोमवारी दुपारी अशोक कृष्णा सपकाळ यांच्या पाच ते सहा गीर गाई सह वासरांना घेऊन दिवानदरा नावाच्या शिवारात चरावयास गेल्या होत्या . त्याचवेळी या गीर गाईच्या कळपावर भर दुपारी बिबट्याने हल्ला केला व गीर गाईचे वासरू बिबट्याने ठार केले . त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दिवसा जनावरांवर बिबट्या हल्ला करू लागल्याने शेतकरीही हतबल झाला आहे .


0 टिप्पण्या