Ticker

6/recent/ticker-posts

‘विभागीय महारोजगार मेळाव्याचे’ पुण्यात आयोजन



सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


कोल्हापूर:- : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, विभागीय आयुक्तालय, पुणे व प्रतिभा महिला प्रतिष्ठान, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता दि न्यू मिलेनियम इंग्लीश मिडीयम स्कूल, समर्थ नगर, एस.बी.आय. बँकेसमोर, नवी सांगवी, पुणे येथे ‘विभागीय महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत-जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या उप आयुक्त (पुणे) अनुपमा पवार यांनी केले आहे. 
महारोजगार मेळाव्यामध्ये पुण्यासह कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 40 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 7 हजार 300 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरिता कळविण्यात आली आहेत. या पदांकरिता किमान 8 वी, 9 वी उत्तीर्णांसह, 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.
 रोजगार मेळाव्यामध्ये स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणारी विविध महामंडळे, दिव्यांग उमेदवारांकरिता विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे माहिती देणारे स्टॉल देखील लावण्यात येणार असल्याने उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देवून आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार, अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक असल्याचे पुणे विभागीय आयुक्तालयाचे कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ज्ञा.सा.मंचरे यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या