Ticker

6/recent/ticker-posts

कर्जतमधील प्रहार ॲकडमी येथे पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबीर संपन्न

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


अलिबाग :- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र " गरुडझेप" मार्फत कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व कर्जत तहसिलदार डॉ.शीतलकुमार रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.30 नोव्हेंबर 2022 रोजी प्रहार ॲकडमी कर्जत येथे पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये कर्जत तालुक्यातील 80 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 
      यावेळी परिविक्षाधीन नायब तहसिलदार अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, मंडळ अधिकारी श्री.राठोड, तलाठी दत्ता ठोकळ तसेच प्रहार ॲकडमीचे प्रतिनिधी श्री.रुपेश यांनी प्रशिक्षणार्थींना पोलीस भरतीच्या अनुषंगाने परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे, पुस्तकांची उपलब्धता, पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व शारिरीक क्षमता चाचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थ्यांना गरुडझेप स्पर्धा परीक्षा उपक्रम आणि “गरुडझेप” ॲपची माहिती तसेच हे ॲप डाऊनलोड कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या