Ticker

6/recent/ticker-posts

आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूटजिल्हा पणन अधिकारी निद्रिस्त



कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडारा:- शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार व्यापारी धान खरेदी करीत नसल्यामुळे धान उत्पादक शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा आश्रय घेतो. पण याही केंद्रावर शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रत्यय आला. धानाचे एका कट्टयात ४० किलो ७०० ग्राम धान्य घेण्याचे निर्देश असले तरी क्विंटल मागे ओलाव्याचे नावाखाली ३ किलो अतिरिक्त धान तर २५ ते ३० रुपये हमाली घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जाते. 
          खरीप हंगामात मुख्य पीक धान असले तरी हमीभावानुसार व्यापाऱ्यांकडून धानाची खरेदी केली जात नाही. त्यामुळे धान उत्पादकांची लूट केली जाते. अशी ओरड होत असते. यावर मात करण्यासाठी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना सुरुवात करण्यात आली. खरेदी शासन करीत असले तरी मुख्य एजेन्सी जिल्हा पणन अधिकारी व आदिवासी विकास महामंडळ आहे. यांचे सनियंत्रणात जिल्ह्यात अनेक संस्थांना खरेदी केंद्र देण्यात आलेले आहेत. या खरेदी केंद्रांवर धानाचे एका कट्टयात ४० किलो ७०० ग्राम धान खरेदी करावे. अशा सूचना असल्या तरी केंद्र संचालकांची मनमानी सुरु असल्याचे चित्र तालुक्यासह जिल्ह्यात दिसत आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर क्विंटल मागे ३ किलो अतिरिक्त धान घेतले जाते. तर हमालीचे नावावर प्रती क्विंटल २५ ते ३० रुपये घेतले जात असल्याची धान उत्पादकांकडून ओरड होत आहे. ही बाब जिल्हा पणन अधिकारी भंडारा यांना माहीत असून सुद्धा याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्यामुळे धान उत्पादकांची लूट केली जात असल्याने "आंधळा दळते आणि कुत्रा पिट खाते" अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. धान उत्पादकांचा कैवारी असल्याचे भासविणारे शासन आधारभूत केंद्रावरील गैरप्रकार थांबवेल काय ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या