Ticker

6/recent/ticker-posts

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी येथील जिल्हा परिषद गांधी कनिष्ठ विज्ञात महाविद्यालयात समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत लँड अ हॅन्ड या संस्थेमार्फत नुकताच इयत्ता बारावीच्या हेल्थ केअर आणि इलेक्ट्रॉनिक च्या विद्यार्थ्यांना मोफत कल चाचणी, बायोमेट्रिक चाचणी, सायकोमॅट्रिक चाचणी, मल्टी स्किल व मोफत करीअर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक रवी मेश्राम होते. बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विशेष म्हणजे महत्वाकांक्षी असावे, स्वप्ने मोठी पहावी, ती पूर्णत्वास नेण्यासाठी धडपडत रहावे. सातत्यपूर्ण नियोजन करावे, ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असावे लागते असे प्रतिपादन रवी मेश्राम यांनीं केले.
         या प्रसंगी उपस्थित प्रमुख मार्गदर्शनक शाहीद सर (लँड अ हॅन्ड), समग्र शिक्षा अभियान यांच्याकडून झेलम वैशंपायन मॅडम यांनीं सांगितले की जीवनात आनंद मिळतो तो आपल्या परिश्रम केल्यानें, बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील वर्षी शिक्षण घेत असतानाच कोणत्याही परिस्थितीत आवडीचे क्षेत्र काय आहे याचाही गंभीरपणे विचार करीत, समस्यावर उपाय करावे . प्रवेश परीक्षा माहिती, शिष्यवृत्ती यांच्यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसोबत हितगुज प्रश्नोत्तरे, चर्चा करून संवाद साधण्यात आला. स्पर्धा परीक्षेत यश कसे मिळवावे, समस्येवर मात कशी करावी, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेल्थकेअर च्या शिक्षिका मेघा बावणे यांनीं केले व आभार रजत गायधनी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या