Ticker

6/recent/ticker-posts

ऑटो व टाटा मॅजिक चालकांकडून प्रवाश्यांची आर्थिक लूट

बसच्या तिकीट दरापेक्षा आकारतात जास्त भाडे 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- जिल्हा मुख्यालयापासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वच रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू असून त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे राज्यात गेल्या अनेक दिवसापासून ग्रामीण व शहरी भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी प्रमाणात धावत असल्यामुळे त्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूक दारांना होत आहे बसची अपुरी संख्या प्रवाशांच्या सोयीनुसार बसची सेवा नसणे ग्रामीण भागात यालाच प्रवासी वैतागून खाजगी वाहतूक करणाऱ्या ऑटो द्वारे प्रवास करीत असतात एसटी महामंडळाच्या संपा पासून ऑटो चालकांनी आपल्या प्रवासाचे दर वाढविले आहे त्यामुळे बसचे तिकीट कमी आणि आटो ची तिकीट जास्त असा प्रकार दिसून येत आहे. 
 मोठे बस स्थानक असले तरीही काही भागात बसच जात नसल्याने खाजगी वाहतुकीशिवाय पर्याय नाही. तालुका मुख्यालयापासून नागपूर, साकोली, अड्याळ, भंडारा, पालांदूर, पोहरा, मुरमाडी /तूप , रेंगेपार (कोठा), मुंडीपार /सिंधीपार केसलवाडा / पवार या मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक करणारे ऑटो, टाटा एस मॅजिक धावत असतात.त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने सोयीची वाटणारी खाजगी प्रवासी वाहतूक धोकादायकही आहे तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला असून प्रवासी जनावरांसारखी कोंबून वाहतूक केली जाते याकडे मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देत नाही आणि एखादी मोठी अनुचित घटना घडली तर हेच वरिष्ठ अधिकारी सांत्वना देण्यासाठी घटनास्थळाला भेट देत असतात. एकेका अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो मध्ये 20 ते 25 जण बसलेले असतात तसेच वाहनांची तपासणी होणार असल्याचे चालकांना आधीच कळलेले असते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे तपासणी मोहीम सुरू केल्यास अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसू शकेल
परवानगी ६ +१
  प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ६ + १ याप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा परवाना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत दिला जातो. या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये कमीत कमी २० ते २५ प्रवासी एका वेळी प्रवास करीत असतात त्यामुळे परवान्याच्या तिप्पट प्रवासी वाहतूक करीत असले तरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी याकडे लक्षच देत नाही त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकार्‍यानी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या