नकळत झालेली अविश्वसनीय भेट
त्यातचं जुळली नाती ऋणानुबंधाची
नकोसा वाटणाराही होऊनीच गेला
अनुभवले क्षण आता मीही प्रेमाची
दोघेही एकमेकांना समजून घेऊन
आपणच बनलो एकमेकांचा आधार
तऱ्हेतऱ्हेचे विचार समोर मांडूनी
केली प्रीत तुझी नि माझी साकार
कोवळ्या कळीतून उमललं एक
टवटवीत फुल फक्त माझ्यासाठी
बहरली सुशोभित वनराई सुगंधाने
तशीच मी फुलराणी तुझ्यासाठी
हातात हात घट्ट तुझा माझा
नजरेतही झुरते प्रेमाची नशा
बेचैन मन मिठीत तुझ्या चित्त
नकोत व्हावया एकांताच्या दशा
गोडवा नात्यात अधिकच वाढला
तुझ्यासारखा प्रियकर सर्वांना लाभावा
मुलींबद्दल नेहमीच आदर , सन्मान
सदोदित मला तुझाच सहारा असावा
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
साथ तुझी आजीवन असू दे
संकटकाळी आधार एकमेकांचा
अशीच प्रीत तुझी माझी फुलू दे
कु. सोनाली कोसे , चंद्रपूर


0 टिप्पण्या