Ticker

6/recent/ticker-posts

घोडेगांवचे सुपुत्र, आदर्श शिक्षक सिध्दनाथ कचरे सर यांचा घोडेेगांंव ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान....


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-
 पैस उद्योग समूह व पसायदान फाऊंडेशनच्या वतीने घोडेगांवचे सुपुत्र व सध्या कुसडगांव ता. जामखेड येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री.सिध्दनाथ दत्तात्रय कचरे यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे ...
त्या निमित्ताने ग्रामपंचायत घोडेेगांंवच्या वतीने त्यांचा यथोचित असा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्याचबरोबर घोडेेगांंव जिल्हा परिषद शाळेचे कर्तव्यदक्ष शिक्षक श्री. राऊत सर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांचा अभ्यास करवुन घेतला यामुळे त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला त्याचबरोबर दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल व एक विद्यार्थी नवोदय साठी निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सरपंचाच्या हस्ते सन्मान करण्यात आला ,अध्यक्षस्थानी जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बोराटे सर होते.

यावेळी उपस्थित विद्यमान सरपंच शरद (काका)जगताप, उपसरपंच शमशाद शौकत मुलाने,मा. सरपंच व विद्यमान ग्रा.पं.सदस्य अंगद (भाऊ)गव्हाळे,ग्रा,पं,सदस्य गणेश रावण,ग्रा.पं सदस्य नारायण भोंडवे,ग्रा .पं सदस्या शितल सुनिल गव्हाळे, सह ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बडे सर,तसेच शिक्षक राऊत सर,ढेंगळे मॅडम,राठोड मँँडम ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, निलेश कचरे,उपाध्यक्ष, महादेव जगताप,प्राथमिक आरोग्य केंद्राचे सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आडसुळे,अंगणवाडी सेविका,रासकर मॅडम,व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
 प्रास्ताविक सरपंच शरद जगताप यांनी मांडले,यावेेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पर आपले मनोगत व्यक्त केले,तर शेवठी आभार विशाल गव्हाळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या