चंद्रशेखर वाघमारे (पपु निवळीकर) संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975
मुंबई : यंदा राज्यात शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे तो अतिवृष्टीने, अन्यथा इतर वेळी पावसाळ्यात पावसाने दडी मारणे सामान्य गोष्ट असते. राज्यातील काही जिल्ह्यांतील शेतकरी हे कोरडवाहू शेती करणारे असल्याने केवळ पावसाच्या पाण्यावर त्यांना अवलंबून राहावे लागते. विदर्भातील आणि मराठवाड्यातील कोरडवाहू शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे आहे, त्यामुळे पाण्याच्या तुटवड्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यावेळी राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.


0 टिप्पण्या