गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद मो. 83081 28457
औरंगाबाद :-येथील श्रीकृष्ण मध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान गौरव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधीसत्व,ज्ञानाचा अथांग सागर,युगपुरुष,विश्वरत्न,
भारतरत्न,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा. अनिल गवळे हे होते. प्रा.पुढे बोलताना म्हणाले की,भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशात समता, स्वातंत्र्य,बंधुता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश केला पाहिजे म्हणजेच संविधान वाचणारे हात तयार झाले पाहिजे. जे ने करुन विद्यार्थी राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करेल असे प्रा. गवळे म्हणाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश भणगे, श्री. ईवरकर, रमेश गायकवाड, राजेंद्र शेळके, विनायक म्हस्के, श्रावणी इन्फोटेकचे श्री.जाधव, प्रवीण शेळके, श्रीमती. डी. डी. सोनवणे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिनेश विसपुते तर आभार श्री. भणगे यांनी केले.


0 टिप्पण्या