दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
उस्मानाबाद :- परांडा शहर व तालुक्यातील सर्व मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ते सर्व रस्ते त्वरित खड्डेमुक्त व दर्जेदार करण्याबाबत वंचित बहुजन आघाडी परांडा तालुक्याच्यावतीने शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारदवाडी फाटा ते परांडा नगरपरिषदपर्यंत हल्लाबोल पदयात्रा काढून आंदोलन करण्यात आले. परांडा शहर व तालुक्यातील सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली असुन खड्डेमय रसत्यावर पायी चालणे देखील अवघड झाले आहे. परांडा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. शहरातील सुफी संत खाजा बद्रोद्दीन दर्गा मुख्य रस्ता,परंडा एसटी स्टँडपासून ते बाहेर जाणारे सर्व रस्ते तसेच शिक्षक सोसायटी अंतर्गत सर्व रस्ते सोबत बावची रोड लगत असलेल्या संगम पार्क अंतर्गतचे रस्ते यामुळे अनेक दिवसांपासुन येथिल नागरीक त्रस्त झाले आहेत. मागे अतीवृष्टीमुळे या भागात रसत्यावर पाणी साचले होते. त्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागला.
परंडा शहराला जोडणारे परंडा- करमाळा, परंडा - कुर्डूवाडी,परंडा- वारदवाडी, परंडा- भुम,परंडा - मुंगशी पालखी मार्ग रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. लवकरात लवकर हे सर्व रस्ते खड्डेमुक्त व दर्जेदार करण्यात यावेत, यासाठी वंचित बहुजन आघाडी परंडा शाखेच्यावतीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हल्लाबोल पदयात्रा काढण्यात आली.
नगरपालिका मुख्याधिकारी न.पा.कार्यालय व परंडा तहसील कार्यालय पेशकार धावारे यांना निवेदन देण्यात आले. परंडा शहर व तालुक्यातील सर्व रस्ते लवकरात लवकर खड्डेमुक्त व दर्जेदार करण्यात यावेत प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी पक्षाद्वारे मोठे आंदोलन उभा करण्यात येइल असा प्रशासनास इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बि.डी शिंदे, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, मोहनदादा बनसोडे ,धिरज शिंदे, शिवाजीराव कांबळे, तानाजी जाधव, किरण बनसोडे, मुसाभाई शेख, फुले आंबेडकर विद्वत सभेचे डॉ.आनंद देडगे, महावीर बनसोडे, विलास जाधव, रणधीर मिसाळ,तय्यब शेख, प्रफुल चौतमहाल,सिद्धार्थ सरवदे, प्रदिप परिहार,नागेश थोरात, विकास लांडगे,धनंजय चौधरी, शंकर लांडगे,अरुण सोनवणे,महेंद्र बनसोडे,चंद्रहास बनसोडे,गणेश सरवदे,संदीप बनसोडे,फिरोज तांबोळी,आश्रु वाघचौरे,जिवण शिंदे,तुकाराम चव्हाण,युवराज जाधव,शमा इलाही शेख,किशार हावळे ,दशरत मारकड कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या