Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव जिल्हा पोलीस आणि जळगाव सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर संपन्न

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

जळगाव :-जिल्हा पोलीस अधीक्षक श्री एम राज कुमार यांच्या संकल्पनेतून , जळगाव जिल्हा पोलीस आणि जळगाव सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी , अंमलदार व त्यांच्या परीवाराकरिता आज दिनांक २२-११-२०२२ रोजी आरोग्य शिबीर घेण्यात आले शिबिराचा 270 पोलीस दलातील अधिकारी अंमलदार व त्यांचे परीवाराने लाभ घेतला . शिबिरात सर्वांचे रक्तदाब , शुगर , ECG करून घेण्यात आले त्या दरम्यान ज्यांना त्रास असल्याचे निर्षानास आले . त्यांना जळगाव सोसायटी ऑफ क्रिटीकल कैअर मेडिसिनचे डॉक्टर्सनी पुढील औषधोपचारासाठी मार्गदर्शन केले . या वेळी मा . अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी यांनी त्यांचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . आणि जळगाव सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिनचे नामवंत डॉक्टर्स डॉ . राजेश डाबी , डॉ . राहुल महाजन , डॉ . सुनील सूर्यवंशी , डॉ . रविद्र पाटील , डॉ . लीना पाटील , डॉ . अभय जोशी , डॉ . गुणवंत महाजन , डॉ . स्वप्नील चौधरी , डॉ . कल्पेश गांधी , डॉ . सुयोग चौधरी , डॉ . नेहा भंगाळे , डॉ . गणेश भारुडे यांनी उपस्थित अधिकारी , अंमलदार व त्यांचे परीवारास निरामय आरोग्य बाबत मार्गदर्शन केले . या वेळी राखीव पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे , सहा . पोलीस निरीक्षक सौ . सुनंदा पाटील , राखीव पोलीस उप निरीक्षक श्री पवार हे उपस्थित होते . आणि सहा फौ , श्री रावसाहेब गायकवाड , पोह . सतीश देसले , पोह . संजय पाटील , पोना . जितेंद्र चौधरी , चंद्रसिंग राजपूत , सर्व पोलीस प्रशिक्षक यांनी शिबीर संपन्नतेसाठी परिश्रम घेतले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या