Ticker

6/recent/ticker-posts

उड्डाण पुलावरून खाली कोसळला कंटेनर, चालक गंभीर

लाखनी येथील घटना 

 मध्यरात्रीची घटना असल्याने मोठा अनर्थ टळला


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- भंडारा कडून साकोली कडे भरधाव वेगाने प्लास्टिक दाना भरलेला कंटेनर जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने लाखनी उड्डाण पुलावरून कंटेनर ३० ते ३५ फूट खाली सर्व्हिस सोड वर कोसळल्याची घटना शुक्रवार(ता.२५) मध्यरात्री २:०० वाजता दरम्यान घडली. यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याचेवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. चालकाचे नाव इकबाल इसाक खान(३४) रा. बिजवा, जिल्हा अलवर(राजस्थान) असे आहे. मध्यरात्रीची घटना असल्यामुळे रहदारी बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. 
           जामनगर(गुजरात) येथून प्लास्टिक दाना भरून नागपूर मार्गे कोलकत्ता कडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनर क्रमांक एनएल ०१ एएफ २९५० चे चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने तसेच तांत्रिक बिघाडामुळे लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलावरून ३० ते ३५ फूट उंचीवरून कंटेनर खाली सर्व्हिस रोड वर कोसळला. मोठ्याने आवाज झाल्याने आजूबाजूचे लोकं घटनास्थळावर जमा झाले व पोलिसांना सूचना करण्यात आली. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे नेतृत्वात पोलिस पथक घटनास्थळावर दाखल होऊन ट्रक चालकास कॅबिन बाहेर काढून डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास असल्याने त्याला सामान्य रुग्णालय भंडारा येथे भर्ती करण्यात आले. दरम्यान कंटेनर चेंदामेंदा झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले. ट्रक खाली कोणीतरी दबला आहे का. याचा शोध लाखनी पोलिसांनी घेण्यासाठी कंटेनर मधील संपूर्ण माल बाहेर काढला. पण कंटेनर मध्ये कोणीही सापडला नसल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. हायगायीने आणि लापर्वाईने कंटेनर चालाविल्या प्रकरणी लाखनी पोलिसांनी कंटेनर चालक इकबाल खान याचेवर कलम २७९, ३३७, ३३८ भादवि तथा मोटारवाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे. घटना मध्यरात्री २:०० वाजता दरम्यान घडली असल्यामुळे रहदारी बंद असल्याने मोठा अनर्थ टळला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या