Ticker

6/recent/ticker-posts

नर्सरीतील बहुमूल्य सागवान वृक्षाची कत्तल


रामपुरी येथील प्रकार 

वन कर्मचाऱ्याचे अक्षम्य दुर्लक्ष 


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडार :- पर्यावरणाचा समतोल टिकविण्यास शासन कटिबध्द असून वनक्षेत्र वाढीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली जाते. पण वन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षित धोरणामुळे बहुमूल्य सागवान वृक्षाची कत्तल केली जात असल्याचा प्रत्यय रामपुरी वनरक्षक बीटात आला. वनरक्षकाचे दुर्लक्षामुळे नर्सरी तील बहुमूल्य सागवान वृक्षाची कत्तल होत असताना वन कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. 
         वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी अधिनस्त असलेल्या वनरक्षक बीट तथा नियतक्षेत्र रामपुरी येथे मागील १० वर्षापूर्वी २५ हेक्टर क्षेत्रात सागवान नर्सरी ची लागवड करण्यात आली होती. आजघडीस ही सागवान वृक्ष अंदाजे दीड ते तीन फूट गोलाई ची व १५ ते २० फूट उंचीची आहेत. या नर्सरी चे संरक्षक व संवर्धन करण्याची जबाबदारी वनरक्षक गोवर्धन सोनटक्के यांचेकडे सोपविण्यात आले आहे. रामपुरी परिसरात सागवान शिवाय इतर इमारती लाकूड व वन औषधी भरपूर प्रमाणात असल्यामुळे गावकऱ्यांसह वन तस्करांचीही नजर रामपुरी आणि परिसरातील वन संपदेवर असते. 
          वन कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहता यावे. यासाठी शासनाकडून निवास स्थानाची व्यवस्था केली गेली असली तरी मागील अनेक वर्षापासून कोणीही वनरक्षक या ठिकाणी राहत नसल्यामुळे देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वनरक्षक स्वगावावरून जाणे-येणे करत असल्यामुळे जाण्या-येण्यातच अधिक वेळ जातो. याशिवाय कार्यालयीन कामे व शासनाने नेमून दिलेल्या इतर कामामुळे वनरक्षकाचे वन संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब हेरून स्थानिक गावकरी व वन तस्करांची नजर या पुरातन सागवान नर्सरी कडे जाऊन अवैध वृक्षतोड सुरू झाली असली तरी या पासून वनरक्षक अनभिज्ञ आहे. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून रामपुरी नर्सरी तील बहुमूल्य सागवान वृक्षाची कत्तल थांबविने गरजेचे झाले आहे. 
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
रामपुरी सागवान नर्सरी शासकीय खुल्या जागेत आहे. अपुऱ्या मनुष्य बळाअभावी या नर्सरी चे संरक्षक करणे अशक्यप्राय बाब असल्यामुळे नर्सरी लगत गावातील गावकरी येथील सागवान झाडे तोडून नेतात. 
*गोवर्धन सोनटक्के, वनरक्षक रामपुरी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या