रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
मुंबई :-राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला . ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली . सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस कृषिमंत्री अब्दुल सत्तार , सहकारमंत्री अतुल सावे , बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे , खासदार धैर्यशील माने , माजी खासदार राजू शेट्टी , माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते . दोन साखर कारखान्यांमध्ये असणाऱ्या हवाई अंतराविषयी सकारात्मक निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले .


0 टिप्पण्या