विद्यार्थी सह महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी.............
जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या व्याख्यानाला मोठा प्रतिसाद...........
डॉ पंडित किल्लारीकर यांचा पुढाकाराने सालाबाद प्रमाणे उत्साहात कार्यक्रम.........
गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457,
औरंगाबाद :- परीवर्तन विचार मंच व श्रीनाथ वैद्यकीय व सामाजिक बहुउद्देशीय संस्था पैठण आणि नॅशनल नेटिवह फेडरेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज पैठण येथे संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅली काढण्यात आली पहिल्या प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पैठण येथील न्यायधीश भावसार यांच्या हस्ते रॅली ला हिरवी झेंडा दाखवून सुरू झाली शहरातील सर्वच शाळेतील विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला यावेळी सर्व विद्यार्थी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो संविधान जिंदाबाद रॅली चालू असताना विद्यार्थी यांनी घोषणा देऊन परीसर दनानुन सोडला. रॅली महाराणा प्रताप चौक एसटी स्टॅण्ड ते डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे पोहचल्यानंतर पहिल्या प्रथम २६/११ च्या हल्यात मुंबई येथे शहिद झालेल्या पोलिस अधिकारी कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थी यांनी व सर्व सहभागी महिला पुरुष संविधान चे वाचन केले. तसेच व्याखेते संजय आवटे यांनी संविधान माहिती सांगितली अनेक महत्त्वाचे संविधानिक माहिती दीली.कार्यक्रम अध्यक्ष स्थानी डॉ पंडित किल्लारीकर हे होते प्रमुख उपस्थिती पाहुणे गट शिक्षणाधिकारी श्रीराम केदार,विस्तार अधिकारी प्रकाश लोखंडे, चेअरमन किशोर चव्हाण, यांची भाषणे झाली शेवटी अध्यक्ष भाषन डॉ किल्लारीकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी अरुण बल्लाळ, रोहिदास टोणपे,प्रा, गजानन मकासरे, राजकुमार पवार, हिरालाल देवकर, गंगाधर निसर्गध, बुद्ध भुषण दाभाडे, सुनील आडसुळ,कल्याण धायकर,अमर भद्रे, संदिप एडके, रवि मोरे, गौतम सोळस, राजेंद्र उगले, स्वप्निल साळवे, इत्यादी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या