अॅड अनिल परब साहेब
शिवसेना विभागप्रमुख / आमदार
चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५
मुंबई -: महाराष्ट्राचे राज्यपाल व सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा तसेच महाराष्ट्रातील महान व्यक्तींचा सातत्याने अपमान केला जात आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायनबद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करण्यात येत आहे. तसेच कर्नाटक राज्यासह इतर राज्यांकडून महाराष्ट्र राज्यच्या सीमाभागांवरील गावांवर दावा करण्यात येत आहे , सध्याच्या सरकारकडून महाराष्ट्र राज्याचे जागतिक राष्ट्रीय आणि आर्थिक महत्व कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेच्या मनात खूप असंतोष खदखदत आहे.
म्हणूनच महाविकास आघाडी तर्फे या झोपलेल्या सरकारला जाब विचारण्यासाठी शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समस्त शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रप्रेमींनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
अॅड अनिल परब साहेब
शिवसेना विभागप्रमुख / आमदार


0 टिप्पण्या