Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र निदर्शने,प्रचंड घोषणाबाजी आंदोल व पोलिसांची धरपकड

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५

औरंगाबाद -: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित पैठण येथे संतपीठाचा प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा काढल्या असे संतापजनक विधान केले होते त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर ठिकाणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आरती करण्यासाठी आले असता आरती झाल्यानंतर मंदिरातून बाहेर पडण्यासाठी निघाले असता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकार्यांनी जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करीत व काळे झेंडे दाखवीत चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
या चंपाचे करायचे काय खाली मुंडके वर पाय,फुले शाहू आंबेडकरांचाविजय असो,चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे, मुर्दाबाद मुर्दाबाद चंद्रकांत पाटील मुर्दाबाद आदी घोषणाबाजीने आंदोलनकर्ते व पोलिसांत काही काळ वातावरण गंभीर बनले होते व आंदोलकांच्या या अचानकपणे झालेल्या कृतीचा कोणालाही अंदाज आला नसल्याने कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला व कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळावरून नेऊन सिटी चौक पोलीस ठाण्यात बराच वेळ बसविण्यात आले होते व तब्बल दोन तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बनसोड,महिला आघाडी शहराध्यक्षा सुभद्राताई जाधव, जिल्हा समन्वयक निशांत पवार,बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर घोडके, सुनिल गायकवाड, शहर कार्याध्यक्ष गणेश काळे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप घोडके,पश्चिम ,शहराध्यक्ष चंद्रकांत पेहरकर, शहर उपाध्यक्ष लक्ष्मण हेकडे,ज्ञानेश्वर गोरे,केतन हेकडे, अजय मगर,अरुणा तिडके,संतोष सुरे,आकाश महानवर आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या