Ticker

6/recent/ticker-posts

एक नवरा अन् 2 बायका ; दोन जुळ्या बहिणींनी केले एकाच तरुणासोबत लग्न, सोलापूरकर शॉक!

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-
  एक बायको करून तिला घटस्फोट देऊन दुसरी केलेली अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील.
किंवा एक बायको असताना दुसरी सोबत लग्न न करता राहणारे अशीही उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील.
पण एकाच मांडवात एकाच वरासोबत एकच हार घालून दोन वधुनी केलेलं हे लग्न पहिलंच असावं 

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केलाय. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे. शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा दुर्मिळ विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या