कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- लाखनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेल्या वन रक्षक बीट बरडकिन्ही व रामपुरी चे अधिनस्त असलेल्या अनेक गावातील धानाचे पूजने, ऊस शेती व तुर पिकाचे हत्तीच्या कळपाने नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्यासाठी शनिवारी(ता.३) प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) महीप गुप्ता यांनी करून वनाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच हत्तीच्या कळपाचे लोकेशन आणि पश्चिम बंगाल वरून आलेल्या पथकाशी चर्चा करून पुढील रणनीती बाबद विचारविनिमय केला.
आठवडाभरापासून २३ संख्येत असलेल्या हत्तीचे कळपाकडून लाखनी व साकोली वन परिक्षेत्राचे सीमावर्ती भागातील वनरक्षक बीट रामपुरी व बरडकिन्ही येथील रेंगेपार/कोहळी, चीचटोला, शिवणी, रामपुरी, नांन्होरी, गडपेंढरी तसेच अड्याळ वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पेंढरी, चान्ना, धानला येथील वन क्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनीतील धानाचे पुजने, मळणी केलेल्या धानाचे बोरे, ऊस वाडी, ऊस बीज निर्मिती तसेच तूर पिकाची प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. जान मालाची कमीतकमी नुकसान व्हावी. या करिता वन अधिकारी व कर्मचारी प्रयत्नरत असून हत्तीच्या कळपाचे लोकेशन असलेल्या वनक्षेत्रात सरपणासाठी जाऊ नये. मोहफुलाची योग्य ती विल्हेवाट लावावी. दारू पिऊन हत्तीच्या संपर्कात येऊ नये. तसेच हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये. अशा सूचना गावकऱ्यांना केल्या जात आहेत. तसेच परिसर सील करून जीवितहानी टाळण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यास मज्जाव केला जात आहे. वन विभागामार्फत केलेल्या उपाययोजना व नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी(ता.३) प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) महिप गुप्ता, उपसंचालक नवेगाव-नागझिरा जेफ, भंडारा चे उपवन संरक्षक राहुल गवई, गोंदिया चे उपवन संरक्षक कुलराज सिंग, साकोली चे सहाय्यक वनसंरक्षक आर.पी. राठोड, वन्यजीव सहाय्यक वन संरक्षक पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, शेखर मेंढे, क्षेत्र सहाय्यक जे.एन. बघेले आणि वन कर्मचाऱ्यांसह नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. तसेच पश्चिम बंगाल वरून आलेल्या चमूसोबत उपाययोजना बाबद चर्चा केली.
*हत्तीचे कळपाकडून तूर पिकाचे नुकसान(चौकट)*
शनिवारी रात्रीचे सुमारास रामपुरी वन क्षेत्रालगत असलेल्या नांन्होरी शेतशिवारातील अजय मेश्राम यांचे शेतातील तूर पिकाचे नुकसान केले आहे. वन कर्मचाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.


0 टिप्पण्या