रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
पुणे :- चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करणाऱ्या आंदोलकांवर बेकायदेशीरपणे लावण्यात आलेले भादवी कलम 307 मागे घेण्याचे राज्य सरकारने जाहीर केले असून त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सदर कलम आम्ही केमिकल एनालायझर चा रिपोर्ट आल्यामुळे मागे घेत असल्याचे रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास सांगितले.
आज सायंकाळी उशिराने राहुल डंबाळे यांनी तसेच प्रमोद शिरसागर, शिवशंकर उबाळे , बुद्धभूषण आहिरे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी “ राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाले असून, तसेच तपासांती उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे आंदोलकांवर लावलेले 307 चे कलम मागे घेण्यात आल्याची माहिती त्यांनी शिष्टमंडळाला दिली.
आंदोलकांवरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने याप्रकरणी अटक कार्यकर्त्यांचा लवकर जामीन होणे शक्य झाल्याने राहुल डंबाळे यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान आंदोलकांच्या पाठीशी अंतर्गत मतभेद व गट तट विसरून संपूर्ण आंबेडकरी जनता ठामपणे एकत्रित उभी राहिल्याने त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याने हे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी अन्य राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी देखील सहकार्याची भूमिका घेतली त्याबद्दल देखील त्यांचे आभार राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले.


0 टिप्पण्या