कवीसंमेलन,चर्चा सत्र ,मुलाखत,नाटक,गीते,रॅप ची असणार रेलचेल
माजी मंत्री गंगाधर गाडे ह्यांचा विशेष गौरव
जेष्ठ साहित्यिक ज.वि पवार,दिलीप मंडल (दिल्ली),सूरज येंगडे (अमेरिका) यांची विशेष भाषणे
रॅपर विपीन तातड यांची 'रॅप टोली' चे युवकांना आकर्षण
रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
औरंगाबाद :-दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड,नागपूर नंतर औरंगाबाद येथे विद्यापीठाच्या नाट्यगृहात 2 दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आंबेडकरी चळवळीतील दलित पँथरच्या काळाचे स्मरण लोकांना व्हावे ,बदलेल्या सामाजिक पार्श्वभूमीवर दलित पँथरची चळवळ आणि प्राप्त परिस्थिती याचे सखोल विवेचन ह्या महोत्सवात कवीसंमेलन,चर्चा सत्र ,मुलाखत,नाटक,गीते,रॅप आदींच्या उपक्रमाच्या माध्यमातून होणार आहे.
शनिवार दि.१७ व रविवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० अश्या वेळेत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन ह्या महोत्सवात करण्यात आल्याचे आयोजक यांनी कळविले आहे.
दि.१७ रोजी सकाळी १०:३० वाजता सागर चक्रनारायण व भाग्यश्री अभ्यंकर ह्यांच्या भीमगित गायनाने ह्या महोत्सवाचे उदघाटन होईल.उदघाटन सत्रानंतर रतनकुमार पंडागळे,रमेशभाई खंडागळे,श्रावणदादा गायकवाड,राजेंद्र गोणारकरअतिष बनसोडे(सोलापूर),डॉ.उत्तम अंभोरे यांचा पँथर चळवळ या विषयावर परिसंवाद होईल.
दुपारी १ ते ३ ह्या वेळेत 'गटार' हे वीरेंद्र गणवीर,नागपूर लिखित दिग्दर्शित नाटकाचे सादरीकरण होईल.
चवथ्या सत्रात दुपारी ३:३० ते ५ या वेळेत
भारतीय संविधान ह्या विषयावर पवनकुमार शिंदे, महेश भोसले,बोधी रामटेके(नागपूर) राहुल सावळे यांचा परिसंवाद पार पडेल
काव्य संगिनी ह्या पाचव्या सत्रात दु.०५.१५ ते सायं.६ ह्यावेळेत देवानंद पवार,सचिन डांगळे(मुबंई)
सुमित गुणवंत(पुणे),आदिती गांजापूरकर(नांदेड) हे आपल्या कविता सादर करतील
सायं. ०६ १५ ते सायं. ०७.४५ ह्या वेळेत स्त्री चळवळ ह्या विषयावर रुख्मीनीबाई सातपुते,माया बनसोडे(मुंबई),वनश्री वनकर(वर्धा),सोनाली मस्के,सुनिता सावरकर, योगिनी पगारे(मुंबई) ह्या चर्चा करतील.
सातवे सत्रात सिनेमा आणि नाटक ह्या विषयावर सायं.०८.०० ते सायं. ०९.०० या वेळेत
शैलेश नरवाडे(नागपूर),सोमनाथ वाघमारे(मुंबई),निलेश आंबेडकर(नाशिक)
अशोक बंडगर (औरंगाबाद) ह्यांचा परिसंवाद होईल.
आठवे सत्रात रात्री ०९.१५ ते रात्री. १०.३० या वेळेत संजय मोहाड स्नेहल प्रधान व प्रबोधून ग्रुप भीमगिते सादर करतील.
दुसऱ्या दिवशी रविवार १८ डिसेंबर २०२२ रोजी
पहिल्या सत्राच्या उदघाटन स. १०.१५ ते १२.४५ या वेळेत जेष्ठ साहित्यिक तथा दलित पँथरचे संस्थापक सदस्य ज. वि. पवार,दिलीप मंडल (दिल्ली),सुरज एंगडे (अमेरिका),प्रविण मोरे (पुणे) हे आपले विचार मांडतील
काव्य संगिनी ह्या दुसऱ्या सत्रात दु. ०१.०० ते दु. ०२ या वेळेत लोकनाथ यशवंत(नागपूर),सागर काकडे(पुणे) शेषराव धांडे (वाशिम)नारायण पुरी (औरंगाबाद) हे आपल्या कविता सादर करतील.
तिसऱ्या सत्रात दु. ०२.१५ ते दु. ०२.४५ या वेळेत ज. वि. पवार(मुंबई),दिलीप मंडल (दिल्ली)
सुरज एंगडे (अमेरिका), अमन कांबळे (नागपूर) यांच्या मुलाखती होतील
चवथ्या सत्रात दु. ०३.०० ते दु. ०४.५५ वेळेत
दयानंद माने (औरंगाबाद),सुकन्या सांथा(मुंबई)
बी.व्ही.जोंधळे (औरंगाबाद)यशवंत भंडारे(औरंगाबाद) यांचा परिसंवाद होईल
पाचव्या सत्रात 'तन माजूरी' हे प्रेमानंद गज्वी लिखित व राहुल जोंधळे दिग्दर्शित लिहीत नाटकाचे सादरीकरण दु. ०४.३० ते सायं. ०६.४५ या वेळेत होईल
सहावे सत्र सायं. ०७.०० ते रात्री ०८.३० या वेळेत होईल त्यात रविंद्र जोगदंड (औरंगाबाद),शिरीष बनसोडे,साहेबराव सदावर्ते(भोपाल),प्रदिप ढवळे
प्रफुल्ल शेंडे ह्यांचे चर्चासत्र होईल
सातवे सत्र चरण जाधव(औरंगाबाद)वनश्री वनकर(वर्धा) राजेंद्र गोणारकर यांच्या
कविता वाचन व सादरीकरणाने रात्री ०८.४५ ते रात्री ०९.१५ या वेळेत संपन्न होईल तररॅप सिंगर विपीन तातड (अमरावती)शास्त्रीय संगीत रोहन कपाळे,सौरभ अभ्यंकर (अमरावती) हे सादर करतील व कार्यक्रमाचा समारोप होईल.
महोत्सवात जेष्ठ पँथर नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचा विशेष गौरव करण्यात येणार असून दोन्ही दिवस दलित पँथरच्या चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्यांचा व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
दलित पँथरच्या इतिहासाला उजाळा देऊन नव्या पिढीला अंतर्मुख करणाऱ्या ह्या महोत्सवात मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन
सतीश पट्टेकर,सचिन निकम,सिद्धार्थ शिनगारे, गुणरत्न सोनवणे,दिपक डांगरे,राहुल वडमारे आदींनी केले आहे.


0 टिप्पण्या