सिनेट चे खुल्या प्रवर्गातील उमेदवार ॲड. प्रशांत गणवीर यांची मागणी
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका वेळोवेळी स्थगित झाल्या याला कुलगुरूंच सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यानी राजीनामा द्यावा. अशी मागणी सिनेट परिवर्तन पॅनल चे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गाचे उमेदवार ॲड. प्रशांत गणवीर व शिलवंत मेश्राम यांनी केली आहे.
कुलगुरू सुभाष चौधरी यांनी मर्जीतील काही उमेदवार व त्यांचे पॅनल ला फायदा पोहचविण्याचे उद्देशाने सर्व नियम धाब्यावर बसून सिनेट निवडणुकीची प्रक्रिया राबविली. त्यामुळेच सिनेट परिवर्तन पॅनल ला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. न्यायालयाने विद्यापीठ प्रशासन कुलगुरू यांना चपराक दिली. विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील पदवीधर मतदानाचा अधिकार बजावतात. सर्व उमेदवारांना या प्रकाराने कमालीचा त्रास सहन करावा लागला. तसेच मतदारांना सुद्धा अनेक अडचणी निर्माण झाल्या. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारास कुलगुरूच जबाबदार आहे. आतापर्यंत सिनेट निवडणूक प्रक्रियेवर झालेला खर्चही कुलगुरूंनी भरून द्यावा. निवडणूक रिंगणात ५९ उमेदवार होते. आता सर्वांना नव्याने नामनिर्देशन पत्र दाखल करावे लागणार असल्याने आर्थिक भुर्दंड भासणार आहे. अगदी तोंडावर आलेली निवडणूक रद्द झाल्याने कुलगुरूंच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने कुलगुरू सुभाष चौधरी यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी ॲड. प्रशांत गणवीर व शिलवंत मेश्राम यांनी केली आहे.


0 टिप्पण्या