Ticker

6/recent/ticker-posts

बिबटाच्या हल्ल्यात शेळी ठार


 रेंगेपार/कोहळी येथील घटना

 पशुपालकात भीतीचे वातावरण


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडारा :- लाखनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वनरक्षक बीट बरडकिन्ही नियतक्षेत्र रेंगेपार/कोहळी येथे सायंकाळचे सुमारास अंगणात बांधलेल्या शेळीवर बिबटाने हल्ला करून ठार मारल्याची घटना गुरुवारी(ता.१५) सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. यात पशुपालक मोहित अशोक कापगते यांचे अंदाजे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. वनरक्षक कावळे यांनी पंचनामा केला. या घटनेने पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
          रेंगेपार/कोहळी लगत वनविकास महामंडळाचे राखीव वनक्षेत्र असल्यामुळे यात तृणभक्षी प्राण्यासह हिंस्त्र श्वापदांचा अधिवास आहे. या हिंस्त्र स्वापदाकडून गावात येऊन अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आजघडीस शेती परवडेनासी झाली असल्यामुळे धान उत्पादक शेतीस पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे वळला आहे. मोहित कापगते यांच्या मालकीच्या शेळ्या जंगलातून चरून आल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अंगणात बांधलेल्या असताना वनक्षेत्रातून आलेल्या बिबटाने शेळीवर हल्ला करून ठार केले. क्षेत्र सहाय्यक उईके यांना घटनेची माहिती देण्यात आली. वनरक्षक कावळे यांनी मौक्यावर येऊन पंचनामा केला व अंदाजे १५ हजार रुपयाचे नुकसानीचा अंदाज वर्तविला. या घटनेमुळे पशू पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या