सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
पुणे :- साठे क्लास पेन येथील 72 मुले व शिक्षक असे शाळेच्या बसने लोहगड येथे आलेले होते त्यापैकी एक बस लोहगड येथून खाली उतरताना दरीत पडलेली आहे. तिचा नंबर MH06 S 9381 महिंद्रा कंपनीची बस आहे काही जणांना किरकोळ लागलेले असून त्यांना पुढील उपचारासाठी राणी ॲम्बुलन्स मधून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आलेले आहे. कोणतीही जीवित हानी झालेली नाही ,मात्र सात ते आठ जण गंभीर जखमी आहे अशी माहिती मिळत आहे.
सदर ठिकाणी लोणावळा ग्रामीण पो स्टे चे पोलिस पथक, शिवदुर्ग टीम, लोहगड ,घेरेवाडी व औंढोली येथील पोलीस मित्र, पर्यटक यांनी मदत केलेली आहे बचावासाठी शिवदुर्ग टीम लोणावळा लोहगड घेरेवाडी येथील स्थानिक तरुण ,सरपंच नागेश मरगळे, पोलीस पाटील सचिन भोरडे, उपसरपंच गणपत महाराज ढाकोळ, लक्ष्मण साबळे ,दत्तू विखार ,भरत भोरडे ,पंढरी विखार, मयूर ढाकोळ ,चेतन विखार, बाळू गवारी व इतर उपस्थित होते


0 टिप्पण्या