सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :-
जामखेड तालुक्यातील ग्रीन व्हॅली समजल्या जाणाऱ्या वाकी परिसरातील शेतकरी गहिनीनाथ साहेबराव कोळेकर (वय 62) हे दि. १० डिसेंबर रोजी रात्री आपल्या शेतातील ज्वारी या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एका रानडुकराने त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. त्यावेळी त्यांनी मोठमोठ्याने आरडा ओरड केल्याने शेजारील शेतकरी मदतीला धावून आले. त्यामुळे रानडुकराने तिथून पळ काढल्यामुळे कोळेकर यांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. रानडुक्कराने केलेल्या हल्ल्यामुळे कोळेकर यांच्या पायाला २५ टाके पडले असून त्यांचेवर खर्डा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या बाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांना समजली असता, त्यांनी सदर शेतकऱ्याची भेट घेतली. तसेच जामखेड येथील वनविभागाचे अधिकारी उबाळे यांच्याशी संपर्क करून सदर रानडुकरांचा बंदोबस्त करावा तसेच शेतकरी गहिनीनाथ साहेबराव कोळेकर यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
तालुक्यातील वाकी येथील खैरी मध्यम प्रकल्पामुळे वाकी परिसरात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने त्या भागात रानडुक्करांचा सुळसुळाट झाला असल्याने रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालूनच शेतीला पाणी द्यावे लागत आहे. याबाबत प्रशासनाने योग्य दखल घेऊन पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी शेतकरी वर्गांमधून होत आहे.


0 टिप्पण्या