सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
वाशिम:- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांचे अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांचे संयुक्तवतीने स्व. राधादेवी यादव वृद्धाश्रम वाशिम येथे ज्येष्ठ नागरिक व वृद्धांसाठी विविध योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आज ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईनचे क्षेत्रीय अधिकारी श्री.टेकाळे होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघ वाशिमचे गजानन साळी,स्व.राधादेवी यादव वृद्धाश्रमाचे अध्यक्ष श्री.यादव आदीची उपस्थिती होती.
श्री.वाठ यांनी संविधान दिनानिमीत्त सामाजिक न्याय पर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित ज्येष्ठ नागरिक व वृद्धांना मार्गदर्शन केले.
श्री. टेकाळे यांनी ज्येष्ठ नागरिक व वृद्धांच्या समस्या व त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे कार्य याबाबत मार्गदर्शन केले.
श्री.साळी यांनी वृद्धांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडी-अडचणी,त्यावर उपाय व वृद्धापकाळात जीवन कसे सुककर करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला श्रीमती संध्या देखणे,व्यवस्थापक अनिल गायकवाड,सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, सर्व ब्रिक्स प्रा.लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्रीमती संध्या देखणे व आभार श्री यादव यांनी मानले.


0 टिप्पण्या