सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
अलिबाग:- रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने व उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अधिकारी 193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ श्रीवर्धन अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी यांच्या पुढाकारातून आज (दि.3 डिसेंबर) रोजी आदिवासी मतदार बांधवांसाठी आंबेली आदिवासीवाडी येथे विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी निवडणूक महसूल सहाय्यक, तलाठी तळा, नागपंचायत लिपिक उपस्थित होते. या शिबिरात नमुना नं.6 चे एकूण 18 अर्ज भरुन घेण्यात आले.


0 टिप्पण्या