सांगली जिल्ह्याचे युवक नेते संदेश भंडारेंची हजेरी
रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
पुणे :-विद्रोही साहित्य व सांस्कृतिक संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात आले असून या संमेलनाचे उदघाट्न समारंभ उत्साहात झाले.
यावेळी सांगली जिल्ह्याचे युवक नेते संदेशभाऊ भंडारे यांनी संमेलनास हजेरी लावली.
14 वे विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनासाठी लेखक तथा तासगावचे सुप्रसिद्ध वकील कृष्णा पाटील, अनिसचे फारुख गवंडी, मेंढपाळ आर्मीचे अर्जुन थोरात, माझे मित्र सुधीर नलवडे, शाहीर सचिन माळी, शीतल साठे, शाहीर चंद्रकांत गायकवाड, पुण्याच्या स्नेहा गायकवाड, पुण्यातील उद्योजक समीर कदम, माजी प्राचार्य अनिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ भारत पाटणकर, डॉ बाबुराव गुरव, कॉम्रेड के डी शिंदे यांच्यासह राज्यभरातील पुरोगामी चळवळीतील जेष्ठ विचारवंतांची भेटी युवक नेते संदेश भंडारे यांनी घेतली.


0 टिप्पण्या