सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7057137098
अहमदनगर :- जामखेड तालुक्यात
खर्डा परिसरातील मौजे जायभायवाडी येथील सविस्तर वृत्त असे कि शुक्रवार दिनांक २३ /१२/२०२२ रोजी दुपारी दिडच्या सुमारास हिंदुराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते उमेश जायभाय, राजु जाधवर, योगेश सुरवसे, बबलु गोलेकर हे गप्पा मारत बसले असताना एक भरधाव वेगाने जात असलेल्या पिक अप (MH 12 KP 7642) मागील बाजूस फळ्या लावुन चालला होता त्यात हालचाल दिसल्याने श्री उमेश जायभाय यांनी सदरील गाडीला हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी न थांबल्याने जायभाय यांनी आपल्या सहकार्यांसह भरधाव वेगाने असलेल्या पिक अप चा पाठलाग करुन गाडी थांबवली
गाडी थांबवली असता त्यात प्रत्येकी ४२.००० रु किमतीचे दोन गावरान वळु , तीन अं किं प्रत्येकी १०.००० किमतीचे पांढर्या व काळ्या रंगाचे लहान वासरे असा एकुण अं किं १.५०.००० रू असलेले गोधन गाडीत बळजबरीने डांबून ठेवलेले अर्धमेल्या अवस्थेत निदर्शनास आले
चालकास नाव विचारले असता इरफान हाशम कुरेशी व बाजुला बसलेल्या अन्सार बादशहा कुरेशी दोघेही (रा.खर्डा) यांना जनावरे कोठे घेऊन चालला आहात असे विचारले असता योग्य उत्तरे न मिळाल्याने श्री जायभाय यांनी सदर घटनेची माहिती खर्डा पोलिस स्टेशन ला माहिती दिली
काही वेळात घटनास्थळी पो. कॉं शेषराव म्हस्के व शाम चखाले घटनास्थळी दाखल झाले
व पिक अपची पाहणी करून पिक अप पोलिस स्टेशन ला आणले
थोडयाच वेळात खर्डा पोलिस स्टेशन येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्ते दाखल झाले.
सदर आरोपी इरफान हाशम कुरेशी (३७) व अन्सार बादशहा कुरेशी(४३)
यांच्यावर पिक अप एम एच १२ के. पी. ७६४२ हिमध्ये बळजबरीने कोंबुन वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (२०१५) कलम (५) अ (५) ब तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा कलम या (३) व (११) यानुसार खर्डा पोलिस स्टेशनचे अतिरिक्त पोलिस निरीक्षक श्री प्रकाश पाटील यांच्याकडे फिर्याद दाखल करण्यात आली.
यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी गणेश ढगे, बबलु निकम, मनोज देशमुख,रुपेश खारगे,सुजित पवार, विजय गव्हाणे , प्रमोद गोलेकर, आकाश खेडेकर, प्रसाद खारगे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर अर्धमेल्या जनावरांवर पशुवैद्यकीय डॉ. शाम गोलेकर डॉ. वडे यांनी उपचार केले. पुढील तपास पो कॉ. म्हस्के व पो. कॉं चखाले करत आहेत.


0 टिप्पण्या