Ticker

6/recent/ticker-posts

मरामाय , अर्जुननगरवासींना रेल्वेचा दिलासा

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


नागपूर :- काटोल नगर परिषद हद्दीतील मरामाय व अर्जुन परिसरातील रेल्वे लाइनच्या दोन्ही बाजूंना असलेली घरे रेल्वे सीमारेषेत येत आहेत . त्यावरील अतिक्रमण १० दिवसांच्या आत काढण्यात यावे , अशा नोटिसा सहायक मंडळ रेल्वे अधिकारी , काटोल यांच्या वतीने ३७ घरमालकांना देण्यात आल्या होत्या . या नोटीस परत घेण्याचे आदेश नागपूर विभागामध्ये रेल्वेने दिले आहे . भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी हा विषय रेल्वे प्रशासनाकडे लावून धरला होता . काटोल शहरात काही दिवसांपासून रेल्वे विभागाच्या वतीने तिसऱ्या लाइनचे काम सुरू आहे . याकरिता रेल्वे विभागाने जागा हस्तांतरित केली आहे . याचदरम्यान रेल्वे विभागाच्या जागेवर काही ठिकाणी असलेले अतिक्रमणसुद्धा काढण्यात आले आहे . हे काढत असताना मरामायनगर व अर्जुननगर या भागात नगरपालिकेच्या हद्दीत वसलेल्या ३७ घरांनासुद्धा रेल्वेरेषेच्या आत असल्याचे दाखवून त्यांना १० दिवसांचा अल्टिमेटम देत अतिक्रमण खाली करण्याची नोटीस काटोल रेल्वे विभागाच्या सहायक अधिकाऱ्यांनी बजावली होती . यामुळे परिसरातील नागरिकांनी धसका घेतला होता . नागरिकांनी चरणसिंग ठाकूर यांच्या माध्यमातून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांची भेट घेतली . यानंतर रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांना कागदपत्रांसह हा विषय पटवून देण्यात आला . रेल्वे प्रशासनाने कागदपत्राची शहानिशा करून काटोल रेल्वे अधिकान्यांची नोटीस खारीज करून नोटीस परत घेण्याचे लेखी आदेश दिले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या