Ticker

6/recent/ticker-posts

हातगाव तालुक्यात तंबाखूच्या पिचका - या मारणारे व धुम्रपान वाढले

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


नांदेड :- हातगाव शहरात व तालुक्यात कुठं ही धूम्रपान करा कुठे ही थुंका व तंबाखू व गुटखाच्या पिचका - या सर्रास सार्वजनिक ठिकाणी मारण्यात येत आहे . यामध्ये नागरिकसह महाविद्यालयीन विद्यार्थीचा पण समावेश होताना दिसुन येत आहे . कोटपा कायद्याच अधिकार पोलिसाना असुन , ही पोलिस या बाबतीत काहीच कारवाई करत नसल्यामुळे खुलेआम धुम्रपान सार्वजनिक ठिकाणी होताना दिसुन येत आहे . अणखीन विशेष म्हणजे काही अल्पयीन मुले सुद्धा सिगारेट तंबाखूजन्य पदार्थाचे वापर करतांना दिसुन येतात . राज्यात बिडी व सिगारेट आणि गुटखा खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . दुसरी गंभीर बाब अशी की कॉलेज शालेय विद्यार्थीसह तरुणामध्ये याचे प्रमाण वाढताना दिसुन येते . यावर आळा घालण्यासाठी 2018 च्या दरम्यान बिडी सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ सेवन बंदी कायदा ( कोटपा ) चे खास प्रशिक्षण पोलिसाना देण्यात आले होते . त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यावर कोटपा कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार पोलिसाना आहेत . या बाबतीत स्थानिय पोलिसाना याचा विसर पडला की काय . ? आसा प्रश्न पोलिसाच्या कार्यशैलीवरुन दिसुन येत आहे . कारण सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करने थुकने आश्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना दिसुन येत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या