पैठण पोलिसांची कसोसीने शोध मोहीम सुरू
गौतम सोनवणे जिल्हा विशैष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457,
औरंगाबाद :- पैठण दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास आपल्या पत्नीच्या डोक्यात फावडे मारून ठार मारणारा नरधाम पती ज्ञानेश्वर पोळ हा घटनेच्या अकराव्या दिवशी पासून फरार आहे. पोलीस त्याचा कसोशीने घेत आहे. या आरोपीच्या शोधासाठी जनतेने सहकार्य करावे असे आव्हान पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केले आहे. २८ वर्षीय मंदा ज्ञानेश्वर पोळ ही आपल्या पतीच्या संशय वृत्तीने तिच्या पासून विभक्त राहत होती असे दोन छोटी मुलं व मुलगी यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मंदा दवाखान्यात काम करीत होती. गेल्या तीन वर्षापासून मंदा विभक्त राहत होती पती ज्ञानेश्वर तिच्यावर संशय घेतच होता संशयच्या भूताने पिछाडलेल्या ज्ञानेश्वराने शेवटी संधी साधत दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी पैठण येथील नेहरू चौकात मंदाचा घात केला, सकाळी मंदा कामावर जात असताना पाठीमागून येऊन ज्ञानेश्वराने तिच्या डोक्यात फावड्याने वार करुन मंदाचा खून केला व घटनास्थळावरून ज्ञानेश्वराने पळ काढला. तो अद्याप सापडलाच नाही या नरधामाला जेरबंद करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केले आहे.
आरोपीचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
ज्ञानेश्वर पुंडलिक पोळ.
वय ३५ ते ३८ वर्षे अंदाजे, चेहरा. चौकोनी हनुवटी निमुळती, नाग. सरळ , मिशी छाटलेली, दाढी छाटलेली. उंची. पाच ते साडेपाच फूट, केस. डोक्यावर दाट केस, पोषाक. पँट शर्ट, याप्रमाणे वर्णन आहे हा आरोपी कुणालाही दिसून आला किंवा आढळून आलास पैठण पोलीस ठाणे क्र.०२४३१/२२३०३३, पोलीस निरीक्षक किशोर पवार मो. क्र. ९८२३८८७६९९ ,पो.हे.काँ. महेश माळी मो.क्र. ८८३०९०९३९८, पोना नरेंद्र अंधारे मो.क्र. ९९२३८४५७७७ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.


0 टिप्पण्या