Ticker

6/recent/ticker-posts

तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची मोफत पुस्तके

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

चंद्रपूर :-सिंदेवाही, मुल, सावली, नागभीड व चिमूर तालुक्यातील विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची मोफत पुस्तके वितरण आज करण्यात आले.

आयुष्यात यशाची शिखर गाठायचे असेल तर शिक्षणाचे महत्त्व समजून घ्या. समाजात मान, प्रतिष्ठा आदर, सन्मान मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सकारात्मक विचार तथा प्रयत्नांची पराकाष्टा करून जिद्द चिकाटी च्या भरोशावर तसेच उच्च शिक्षणाच्या सहाय्याने यशाचे उंच शिखर गाठता येईल. आयुष्यात अनेक अडचणी संकटी येतात मात्र या संकटांना तोंड देत मार्ग काढून त्यावर विजय कसा प्राप्त करता येईल यासाठी सदैव प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. मनुष्याचे खरे धन हे शिक्षणातून मिळालेले ज्ञान हेच असून ते कुणीही सोडू शकत नाही. स्वप्नाला वास्तव्याची साथ मिळाल्यास यश प्राप्ती मिळून उद्दिष्ट गाठता येईल व आपले भविष्य उज्वल ही करता येईल.

आयोजित कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विनोद आसुदानी, जि. प. माजी सभापती दिनेश चिटनुरवार, सिंदेवाही काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अरुण कोलते, माजी तालुकाध्यक्ष वीरेंद्र जयस्वाल, शहर अध्यक्ष सुनील उट्टलवार, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपाध्यक्ष मयूर सुचक प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या