Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय ग्राहक दिनाचे २७ डिसेंबर रोजी आयोजन

ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


अहमदनगर :- राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे २७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. 

राष्ट्रीय ग्राहक दिन दरवर्षी २४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

प्रत्येक माणूस हा प्रथम ग्राहक आहे. ग्राहक जागृती होण्याच्या दृष्टीने त्यांचे हक्क व कर्तव्य याची जाणीव व्हावी व तो सुजाण व्हावा. यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आलेला आहे. ग्राहक चळवळीशी सबंधित सर्व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित राहून ग्राहक चळवळ व शासन स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे महत्व जाणून घ्यावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या