उसगाव येथील घटना
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी येथील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील उसगाव येथील धुणे धुवायला गेलेल्या महिलेचा तोल जावून तलावात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १६ ) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. पुष्पा उर्फ अनुरथा दिलीप मडावी वय ४५ वर्षे रा. उसगाव ता. साकोली, जि. भंडारा असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे
मृतक पुष्पा मडावी यांनी नेहमीप्रमाणे घरची कामे आटपून घरची कपडे धुण्याकरिता गाव तलावावर सकाळी ११ वाजताच्या सुमारास गेल्या होत्या धुणे धुत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने त्या पाण्यात पडल्या खोल पाण्याच्या अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या यातच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती नातेवाईकांना व लाखनी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस हवालदार सुरेश आत्राम, संजय अरकासे, पोलिस नायक रामकृष्ण बावनकुळे घटनास्थळी पोहोचले. बघता बघता बघ्यांची घटना स्थळी गर्दी जमली. उपस्थित नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय परीक्षणासाठी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन होण्यास होते. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार सुरेश आत्राम तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या