सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य*
मो. नं. 7058137098
अहमदनगर :-जाधव यांचा सणसवाडी नगरी मध्ये जाहिर सन्मान..आदिवासी व भटक्या विमुक्तांचे महाराष्ट्र राज्याचे नेते तथा ग्रामीण विकास केंद्र या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट डॉ.अरूण जाधव यांना विक्रमशिला हिंदी विद्यापीठ भागलपूर (बिहार) शाखा-महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा समाजरत्न पुरस्कार 2022 साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी कुलगुरु डॉ.संजीवजी सोनवणे यांच्या शुभहस्ते देऊन गौरव करून सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
डॉ.अरूण जाधव हे संपुर्ण महाराष्ट्र राज्यात समाजसेवक म्हणुन परिचित आहे,त्यांनी गेल्या 32 वर्षात दलित,आदिवासी,भटके विमुक्त,अल्पसंख्याक,शेतकरी,कष्टकरी वंचित गोरगरिबांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चे,धरणे,आंदोलने केली व त्यांना कित्येक वेळा जेल मध्ये बसावे लागले,त्यातुन न्याय मिळवुन देण्याकामी प्रामाणिकपणे प्रयत्न केले याच विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेवुन त्यांना विक्रमशिला हिंदी विद्यापीठ शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा संपन्न होऊन आपल्या मुळ गांव असलेल्या पुणे वरून जामखेडला जात असतांना पुण्यभुमी असलेल्या नामांकित सणसवाडी नगरी मध्ये त्यांचा संघर्ष फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहिर सत्कार करून सन्मान करण्यात आला.यावेळी फुले,शाहु,आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या जाहिर सत्कार कार्यक्रमाप्रसंगी संघर्ष फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,राज्य प्रवक्ते रिजवान बागवान,राज्य सचिव शितलकुमार गाजरे,बोध्दाचार्य विश्वनाथ घोडके,सामाजिक कार्यकर्ते माऊली गायकवाड,बापु निकुंभ,धनंजय कावरे,पंजाब फुलमाळी,सुधाकर मंजुळे,सुधाकर लोखंडे,प्रदिप धनवे,विवेक किर्तक,गोविंद सोनकांबळे,गंगाराम गायकवाड,मलिकाअर्जुन वाघमारे,गंगाधर गायकवाड,राजु घनधाव आदि उपस्थित होते.


0 टिप्पण्या