Ticker

6/recent/ticker-posts

" फुले , शाहू , आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध. "( कट्टर शिवसैनिक भास्करराव हिवाळे )

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


जळगाव : -आजच्या स्थितीमध्ये अधोगतीने मंत्री झालेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याच प्रकारचा अभ्यास न करता फुले, शाहू, आंबेडकर  यांच्या बाबतीमध्ये अपशब्द काढू नयेत. कारण , स्वतः हा जात लपवून मराठा पाटलांच्या पाटिलकीला सोबत घेऊन राजकारण करणारे चंद्रकांत पाटील यांनी जातीयवाद निर्माण करू नये अन्यथा ऍट्रॉसिटी चे गुन्हे दाखल करू असे भास्करराव हिवाळे उद्धव ठाकरे साहेब गट समर्थक कट्टर शिवसैनिक यांनी आवर्जून सांगितले आहे.
त्याचप्रमाणे लपवाछपवी करून महाराष्ट्र राज्यामध्ये दिशाभूल करणारे पुण्यामध्ये धंदापाणी करणारे चंद्रकांत पाटलांनी आपला इतिहास बघावा. फुले, शाहू, आंबेडकर यांची बरोबरी करू शकत नाही याबाबतीमध्ये अगोदर नीट अभ्यास     करावा. " ज्या शाळेमध्ये गेले असाल त्या शाळेचे आम्ही मुख्याध्यापक आहोत " एवढं लक्षात ठेवा. आणि ब्राम्हणांनी महाराष्ट्रात जास्त आव आणू नयेत . ब्राम्हणनीती फक्त वाद निर्माण करत असते  व  फुकटचे मिळेल तेथे खाते त्यामुळे फुले , शाहू , आंबेडकर यांना शेवटपर्यंत कळणारच नाहीत. याबाबतीमध्ये  मागासवर्गीयांच्या नादी लागू नका . फुले, शाहू , आंबेडकर या महापुरुषांच्या बाबतीत तोंड सांभाळून बोला असेल भास्करराव हिवाळे यांनी ठणकावून सांगितले. याबाबत लवकरच त्यांच्या विरोधामध्ये पुतळा दहन करण्यात येईल असे हि आवर्जून सांगितले. जामनेर तालुक्यामध्ये संपूर्ण मा. उद्धव ठाकरे साहेब गटाचे कार्यकर्ते संताप व्यक्त करून  जाहीर निषेध करत आहेत  असे साप्ताहिक बहुजन सेवकचे उपसंपादक अशोक जाधव कळवितात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या