Ticker

6/recent/ticker-posts

कर्जत तालुक्यातील प्रगती बचतगटाच्या महिलांना तेलंगणा येथील नॅशनल कॉन्फरन्सला उपस्थित राहण्याची मिळाली संधी

 
बचतगटाच्या महिलांनी अनुभवला पहिला विमान प्रवास

 सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

अलिबाग :- हैदराबाद येथे झालेल्या बचतगट फेडरेशन बँक लिंकेज आणि बचतगट फेडरेशन ॲवार्ड कार्यक्रमाला (दि.16 व दि.17 डिसेंबर 2022) रोजी तेलंगणा येथे उपस्थित राहण्याची संधी कर्जत तालुक्यातील प्रगती बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा व बचतगटातील एक महिला हेमलता चिंबुलकर आणि बचतगट फेडरेशनच्या व्यवस्थापिका पदमावती गायकवाड यांना मिळाली.
       तसेच महाराष्ट्रामध्ये बचतगट चळवळ आणि बचतगट फेडरेशन कशा प्रकारे कार्यरत आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली. विशेष म्हणजे बचतगटाची महिला म्हणून विमान प्रवास करणे आणि नॅशनल कॉन्फरन्सला हजेरी लावणे खूपच प्रेरणादायी आहे आणि ती संधी, तो मान कोकणातील रायगडला मिळाला हे विशेष आहे. तसेच या कॉन्फरन्ससाठी भारतातील एकूण 20 राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक राज्यातील महिलांचे विचार, आचार अनुभवायला मिळाले, उत्साह पाहायला मिळाला, महिलांनी ठरविले तर त्या खूप काही करू शकतात, अशी माहिती प्रगती बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या