Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्ती वेतन प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी दि.23 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीचे आयोजन

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


अलिबाग:- रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी हे सन- 2022 -2023 मध्ये निवृत्त होणार आहेत किंवा झालेले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील राज्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे कार्यालयीन स्तरावर तसेच वेतन पडताळणी पथकाकडे व रजा मंजूरीच्या कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. 
      या पार्श्वभूमीवर विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्याकरिता शुक्रवार, दि.23 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3.00 वा.जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जिल्हास्तरीय “पेन्शन अदालत” आयोजित करण्यात आली आहे. 
       तरी जिल्ह्यातील प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या पेन्शन अदालतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या