Ticker

6/recent/ticker-posts

रत्नापूर राणी जाधव, राजुरी अश्विनी कोल्हे राष्ट्रवादी चे सरपंच तर शिऊर गिरीजा उतेकर भाजपचे सरपंच, जामखेड तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतचे निकाल जाहीर


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :- 
           जामखेड तालुक्यातील तिन्ही ग्रांमपंचायतीचे निकल जाहिर झाले असुन झालेल्या चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत रत्नापुर व राजुरीत राष्ट्रवादी तर शिऊर ग्रामपंचायतमध्ये भाजपाकडे सरपंच आले आहे. 
  जामखेड कर्जत मतदारसंघांपैकी एक असलेल्या जामखेड तालुक्यात या टप्प्यात फक्त तीनच ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार व भाजपाचे आ. प्रा. राम शिंदे यांच्या यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या. दिनांक १८ डिसेंबर रोजी यासाठीचे मतदान पार पडले होते. तेंव्हापासूनच दोन्हीकडील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून दावे प्रतिदावे करत या ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात कशा येतील याचे गणित मांडले जात होते.
त्यानुसार आज दि. २० डिसेंबर रोजी याबाबतचे चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतचे निकाल जाहीर होऊन रत्नापुर व राजुरी राष्ट्रवादी तर शिऊर भाजपाकडे आली आहे.

१) रत्नापूर ग्रामपंचायत - विजयी उमेदवार 

सरपंच राणी लक्ष्मण जाधव - अनुसूचित जाती स्त्री, 

प्रभाग क्रमांक १ - साळवे रामदास नवनाथ - अनुसूचित जाती, शेख निजाम कालेखा - सर्वसाधारण, महारनवर आशाबाई गोरक्ष - सर्वसाधारण स्त्री. 
 प्रभाग क्रमांक २
शैलेश विजय कदम सर्वसाधारण, शोभा चंद्रकांत वारे - सर्वसाधारण स्त्री, सिमा शैलेश कदम - सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक ३ मधुकर सुधाकर वराडे - सर्वसाधारण, ज्योती अशोक मोरे - ना. मा. प्र. स्त्री, मनिषा दिलीप वारे सर्वसाधारण स्त्री. 
2 ) शिऊर ग्रामपंचायत

सरपंच गिरीजा गौतम उतेकर सर्वसाधारण स्त्री,
प्रभाग क्रमांक १ नरेंद्र आण्णा पाचारे अनुसूचित जाती, आजीनाथ बंन्सी निकम -सर्वसाधारण, प्रियांका भाऊसाहेब तनपुरे सर्वसाधारण स्त्री, 
प्रभाग क्रमांक २ सेवक शहाजी फाळके - ना. मा. प्रा. व्यक्ती, शोभा बापूराव पिंपरे - सर्वसाधारण स्त्री, शितल अशोक इंगळे - सर्वसाधारण स्त्री, 
प्रभाग क्रमांक ३ बदाम बाबासाहेब निंबाळकर - सर्वसाधारण, उषा नारायण निकम सर्वसाधारण स्त्री,राजश्री दादा लटके सर्वसाधारण स्त्री
3 ) राजूरी ग्रामपंचायत

 सरपंच अश्विनी सागर कोल्हे सर्वसाधारण स्त्री, 

प्रभाग क्रमांक १ विशाल अशोक चव्हाण ना. मा. प्रा. सुनिता मुकिंदा कोल्हे सर्वसाधारण स्त्री, संगीता बाळू मोरे सर्वसाधारण स्त्री, 
 प्रभाग क्रमांक २ बाबासाहेब रामदास घुले सर्वसाधारण, किर्ती नानासाहेब खाडे ना. मा. प्रा. स्त्री, मिनाक्षी संजय खाडे सर्वसाधारण स्त्री, 
 प्रभाग क्रमांक ३ गायकवाड सुरज सुनिल - अनुसूचित जाती, गौतम आश्राजी फुंदे सर्वसाधारण, संगीता शिवदास कोल्हे सर्वसाधारण स्त्री

रत्नापूर ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांच्या नेतृत्वाखालील तर शिऊर मध्ये गाव भाजपाचे जेष्ठ नेते बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतची निवडणुकीत लढवण्यात आली आहे. 

या विजयाबद्दल तिन्ही गावातील विजयी पॅनलच्या वतीने जल्लोष साजरा केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या