12 वर्षांचा झाला रस्ता- मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजनेतून झाले.
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी तालुक्यातील सिंदीपार या गावाकडील जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे सालेभाटा या गावाकडे जाण्याचा मार्ग हा 2010 साली मुख्यमंत्री निधीमधून घेण्यात आले होते. त्यानंतर त्या मार्गावर कुणाचे लक्ष नाही. आज रोजी या रोडाची दूरदर्शा खूप खराब झाली आहे. त्याबरोबर सिंदीपार , मुंडीपार या गावचे शाळेतील विद्यार्थी शाळेकड़े ,दवाखाना, बाजारपेठ, तालुकाकड़े ,याचं मुख्य मार्गाचा वापर करतात. त्यामुळे त्या रोडावरून विद्यार्थ्यांचे अपघात होण्याची सुद्दा शक्यता आहे. या रोडासाठी सिंदीपार गावातील नागरिकांनी बऱ्याचदा लोकप्रतिनिधी कडे मागणी केली आहे. पण काही तोडगा लागला नाही. वारंवार ग्रामपंचायत , पंचायत समिती सदस्य , जि. प. सदस्य, आमदार, खासदार या सर्वांकडे तक्रार दिली आहे. तरीपण या गावाकडे दुर्लक्ष सगळ्यांनी केले आहे.
तरी या रोडाला डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे. अशी मागणी सिंदीपारचे ललितभाऊ येळेकर ,सतिश जी बिसेन, पद्माकरजी पंधरे ,चंद्रशेखर ठेभुने, किशोर येळेकर,अनिल येळेकर ,बलिराम चौधरी,विनायक युरपुडे यांची मागणी आहे.


0 टिप्पण्या