Ticker

6/recent/ticker-posts

मुरमाडी/तूप. परिसरात बिबटाची दहशत


अनेक पाळीव प्राणी केले फस्त

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- लाखनी तालुक्यातील चूलबंद नदीखोऱ्यात वसलेल्या वन व्याप्त दुर्गम परिसर म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या मुरमाडी/तूप परिसरातील अनेक गावात रात्रीचे सुमारास जाऊन बिबटाने अनेक पाळीव प्राण्याची शिकार करून पशू पालक शेतकऱ्यांचे नुकसान केले असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या उच्च प्रजणीच्या धानाचे मळणी चा हंगाम सुरू असल्याने मजूर शेतावर काम करीत असतात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने या बिबटाचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. 
           वन परिक्षेत्र लाखनी चे अधिनस्त वनरक्षक बीट रामपुरी आणि मुरमाडी/तूप चे अधिनस्त चीचटोला, धाबेटेकडी, शिवनी, मोगरा, नांन्होरी, दिघोरी, रामपुरी, मुरमाडी, डोंगरगाव, मिरेगाव, सोनमाळा, भूगाव, मेंढा, विहीरगाव, कोलारी, झरप, कोलारा, कन्हाळगाव इत्यादी गावांचा समावेश होतो. हा परिसर चूलबंद नदी खोरे म्हणून ओळखला जातो. या परिसरात अनेक गावात मोठ्या झाडांचा जंगल व झुडपी जंगल असल्यामुळे वनव्याप्त दुर्गम परिसरात म्हणून ख्याती प्राप्त आहे. या जंगलात तृणभक्षी प्राण्यासह हिंस्त्र श्वापदांचाही अधिवास असला तरी या जंगलाचे रक्षणाची जबाबदारी २ वनरक्षक आणि काही रोजंदारी वन मजुरावर आहे. मनुष्यबळाअभावी या वन क्षेत्राचे संरक्षण अशक्यप्राय बाब आहे. या परिसरातील अनेक गावात रात्रीचे सुमारास बिबट गावात येऊन पाळीव प्राण्यांची शिकार करतो. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रामपुरी येथे पाळीव कुत्रा, डोंगरगाव/साक्षर येथे कोंबडे, मेंढा येथे शेळ्या, विहीरगाव येथे शेळ्या तर मिरेगाव येथे रेडकू ची शिकार केली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबटाचे दिवसाही अनेकांना दर्शन झाल्याचे विश्वसनीय वृत्त असून या बाबद वन अधिकारी व कर्मचाऱ्यानाही माहिती असली तरी बिबटाचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सध्या मुरमाडी/तूप परिसरातील अनेक गावात धानाचे मळणी चा हंगाम सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी धानाची पोती शेतातच ठेवल्याने शेतकरी शेतातच असतो. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने या बिबटाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या