Ticker

6/recent/ticker-posts

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदानाचा गौरव करणारे प्राधानमंत्री नरेंद्र मोदींचे रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरिणीमध्ये अभिनंदनाचा ठराव मंजूर - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-
*कन्याकुमारी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी* 

*देशभरात 5 कोटी सदस्य बनविण्याचा  रिपाइंचा निर्धार*

    महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील  अतुलनीय योगदानाच्या गौरवासाठी देशभरात त्यांची विविध भव्य स्मारके उभारणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणी सभे मध्ये मंजूर करण्यात आला. इंदूमिल मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभरण्यात येत आहे.दिलीत 26 अलीपुर रोड निर्वाणभूमी येथे भव्य  संविधान ग्रंथ आकारातील स्मारक उभे आहे. जन्मभूमी महू ; दिल्लीतील 15 जनपथ येथे आंतराष्ट्रीय डॉ आंबेडकर केंद्र अशी अनेकविध  स्मारके उभारून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आल्याची माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे. 
नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब अनेक्सी सभागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची राष्ट्रीय कार्यकरिणी ची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत देशभरातील 30 राज्यांचे  रिपाइंचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नुकताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत पाकिस्तान चे बिलावल भुट्टो यांनी चुकीचे वक्तव्य करणारी गरळ ओकली आहे. बिलावल यांच्या आईचा मृत्य हा दहशतवादी हल्ल्यात झाला असताना ही बिलावल हे दहशतवादी प्रवृत्तीचे  समर्थन करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांचा अतिरेक्यांशी तुलना करतात याचा आम्ही निषेध करतो. प्रधानमंत्र्यांचा अवमान हा देशाचा अवमान आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष मूग गिळून गप्प बसले असल्याने त्यांचा ही आम्ही निषेध करतो. मध्य प्रदेशातील एका काँग्रेस नेत्याने मोदींबद्दल अपशब्द काढत त्यांच्या हत्येचा आवाहन केले होते. या सर्व निंदनीय प्रकाराचा निषेध करणारा ठराव आज रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर झाला असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी आज दिली. 
कन्याकुमारी येथे बंगालचा उपसागर ; हिंदी महासागर आणि अरबी समुद्र असे तीन समुद्र एकत्र येतात. त्यामुळे लहान मोठा हा भेदभाव विसरून सर्व जाती धर्माचे भेदभाव विसरून माणसाने माणूस म्हणून एकत्र राहिले पाहिजे हा एकतेचा विश्व बंधुतेचा आणि समतेचा संदेश देण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा कन्याकुमारी येथे उभारावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तामिळनाडू च्या मुख्यमंत्र्यांना करण्यात आली असून केंद्र सरकार तर्फे ही यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.

पुढील वर्षी 2023 मध्ये कर्नाटक ;त्रिपुरा;मेघालय; नागालँड आणि राजस्थान या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक होत असून या पाच ही राज्यात भाजप सोबत युती करून निवडणुका लढण्याचा ठराव आज  रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरिणी मध्ये मंजूर करण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले  पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरिणी सभे मध्ये अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले; रिपाइं महिला आघाडी च्या मार्गदर्शक सौ.सीमाआई आठवले; भुपेश थुलकर; डॉ वेंकटस्वामी; कुमार सेन बौद्ध;  मंजू छिबेर; राहुलन आंबवडेकर; एम एस नंदा; कांतिकुमार जैन;  गौतम सोनवणे; सौ शिलाताई गांगुर्डे;पप्पू कागदे;सुरेश बारशिंग;  दयाळ बहादूर; पोपटशेठ घनवट; ऍड.बी के बर्वे; ऍड. नितीन शर्मा; कुंदन लाटे; अनिलभाई गांगुर्डे;  ऍड.ब्रह्मानंद रेड्डी;  शिवा नागेश्वर राव; मगेश्वर रेड्डी; विनोद निकाळजे; नितीन तायडे; फादर सुसाई; ऍड.मिथिलेश पांडे;ऍड.अरुण कुमार; राधाकृष्ण सैनी;किशोर मासुम;डॉ प्रीतिष जळगावकर; मृत्युंजय मलिक; प्रभुदास संध्या गुप्ता; डब्ल्यू मेहता;  आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.   रिपाइं चे उत्तर प्रदेशातील नेते दिवंगत जवाहर लाल यांना रिपाइं तर्फे  भावपुर्ण श्रद्धांजली 
अर्पण करून रिपाइं च्या राष्ट्रीय कार्यकरिणी सभेचा समारोप करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या