Ticker

6/recent/ticker-posts

पो.स्टे . हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून जबरी चोरीचा गुन्हा उघड आरोपीकडुन ७ चोरीच्या मोटरसायकल व ३ मोबाईल हस्तगत करून एकुण किं . १ , ९ ३,००० / - रू . चा माल जप्त .


सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


वर्धा :-दिनांक ०५-१२-२०२२ चे रात्री २०.०० वा . सुमारास फिर्यादी श्री दुलारसिंग श्रीकपिल पासवान , रा . म्हाडा कोलोनी , हिंगणघाट हे झांसी राणी चौक , हिंगणघाट येथुन पायदळ फोनवर बोलत जात असतांना दोन अज्ञात मोटरसायकल वरील इसम फिर्यादीचे मागुन येवुन त्याचे हातातील मोबाईल जबरीने हिसकावुन घेवुन गेल्याने फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप.क्र . १२८०/२०२२ कलम ३ ९ २ , ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला . सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवून हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन आरोपी व चोरलेल्या मोबाईलबाबत शोध घेतला असता , सदर गुन्हयातील जबरीने हिसकावुन नेलेला मोबाईल हा निशानपुरा वार्ड , हिंगणघाट येथे राहणारे गौरव श्रीधर वाघमारे व विधि संघर्षित बालक दोन्ही रा . निशानपुरा वार्ड , हिंगणघाट यांनी हिसकावुन नेल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता , त्यांनी सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यांचेकडुन एक विवो कंपनीचा ॲन्ड्राईड मोबाईल व गुन्हा करण्याकरीता वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र . एमएच ३४ / क्यु -४३५८ असा आरोपी व विधी संघर्षित बालक यांचे ताब्यातुन जप्त करून आरोपी गौरव वाघमारे यास अटक करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला . सदर गुन्हयातील आरोपी गौरव वाघमारे याची पोलीस कोठडी घेतली असता , त्यास जबरी चोरी करीता वापरलेल्या वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने ते वाहन पो.स्टे . गिरड हद्दीतील कोरा गावातुन चोरल्याची कबुली दिली . तसेच त्याने त्याचे दोन विधी संघर्षित बालकासह जिल्हयातील व बाहेर जिल्हयातील विविध प्रकारच्या ७ मोटसायकल व २ मोबाईल चोरल्याचे कबुली दिली . आरोपी गौरव वाघमारे याचेकडुन ७ मोटरसायकल , सदर गुन्हयात जबरीने चोरलेला एक मोबाईल व इतर दोन चोरलेले मोबाईल असा एकुण जुमला किमंत १ , ९ ३,००० / - रू . चा माल जप्त करण्यात आला . सदर कारवाई मा . पोलीस अधीक्षक श्री . नूरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक श्री . डॉ . सागर कवडे , उपविभागीय पोलीस अधिकारी , हिंगणघाट श्री . दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री . कैलाश पुंडकर , पोलीस स्टेशन , हिंगणघाट यांचे निर्देशांप्रमाणे पोउपनि . सोमनाथ टापरे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार शेखर डोंगरे , निलेश तेलरांधे , सचिन घेवंदे , विशाल बंगाले , सचिन भारशंकर संतोष गिते व सायबर शाखेचे दिनेश बोथकर यांनी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या