Ticker

6/recent/ticker-posts

अकलूज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वस्तीगृह इमारत त्वरित नव्याने बांधून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबण्याची पीआरपीची मागणी

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

सोलापूर :-प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत असणारी अकलूज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाची इमारत नव्याने बांधून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवण्याची मागणी सोलापूर समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी शुक्रवार ९ डिसेंबर रोजी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सदरचे निवेदन सोलापूर समाज कल्याण कार्यालयाच्या शासकीय निवासी शाळा विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे स्वीकारले निवेदनामध्ये सध्याचे वस्तीगृह हे भाड्याच्या इमारतीत चालविले जात असून वस्तीगृहाच्या भाड्यापोटी शासनाचे आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत भाड्यासाठी खर्च झालेल्या कोट्यावधी रुपयांमध्ये शासनाची नव्याने इमारत उभारली गेली असती तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या भाड्याच्या इमारतीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली असून यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे सदरच्या या मागणीसाठी सोमवार १२ डिसेंबर पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय अकलूजसमोर समाजातील काही मान्यवर आमरण उपोषणाला बसणार आहेत त्या उपोषणास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जाहीर पाठिंबा असून सदरच्या उपोषणादरम्यान त्यांचे जीविताला जर काय गंभीर इजा झाली तर त्याचे पडसादही भयानक उमटतील.सदरच्या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनेही तीव्र आंदोलन केले जाईल कृपया आपण याची नोंद घ्यावी त्यामुळे अकलूजमधील समाजकल्याण संचालनालयाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची शासकीय वस्तीगृहाचे इमारत त्वरित नव्याने बांधून निर्मिती करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे राज्यपाल,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवलेसाहेब,मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर,महाराष्ट्राचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त पुणे,प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे व जिल्हाधिकारी सोलापूर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे शिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत सरवदे सोलापूर शहर कार्याध्यक्ष शरणू हजारे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या