जलजागृती अभियानाचा शुभारंभ
सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
यवतमाळ: यवतमाळमधील संस्थांनी वाघाडी पुनरुज्जीवनासाठी सुरु केलेली कामे इश्वरी कार्य असुन अशा कामांच्या मी सदैव पाठीशी होतो, आहे आणि भविष्यातही राहणार असल्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
वाघाडी येथे स्वच्छ- सुंदर वाघाडी अभियानाच्या जलजागृती मोहीमेच्या शुभारंभ कार्यक्रमात उद्घाटनपर भाषणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, मुख्य वनसंरक्षक व्ही.टी.घुले, उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, रघुनाथ कापर्ती, प्रदिप वडनेरकर, नितीन खर्चे, नितीन गिरी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, कलीयुगातला मनुष्यप्राणी स्वार्थी असल्याचे एकले होते, आता ते अनुभवतोय. प्राणवायु देणारे वृक्ष कापायचे, पोषण करणा-या नदीचे शोषण करायचे, ज्या नदीचे पाणी आपल्या शरीर व मनाला स्वच्छ करते ते पाणी अस्वच्छ करायचे अशी चुकीचे कार्ये श्रेष्ठ समजणाऱ्या मनुष्यप्राणांकडुन होत आहेत. मात्र या विषम परिस्थितीतही येथील संस्था एकत्रित येऊन स्वयंस्फुर्त सेवा कार्य करित असल्याचे कौतुक आहे. हेच इश्वरी कार्य आपल्याला वसुंधरेचं रक्षण करायला प्रेरणा देते. हे मनुष्याने समजुन घेतले पाहीजे. अन्यथा दंड करण्यापूर्वीच देव आपल्याला मृत्युदंड केल्याशिवाय राहणार नसल्याचे श्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
खासदार भावना गवळी यांनी या पर्यावरणपुरक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर आमदार मदन येरावार यांनीही या सेवा प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. संस्थांच्या वतीने अजय मुंधडा यांनी प्रास्ताविकातुन वाघाडी येथे सुरु असलेली मोहीम विषद केली. संतोष भोयर यांनी सुत्र संचालन केले तर अश्विन सवालाखे यांनी आभार मानले. आयोजनाकरिता अभियानात सहभागी पर्यावरण संरक्षण समितीचे संकल्प डांगोरे, शैलेश राव, यवतमाळ प्लॉगरचे भूषण क्षीरसागर, यामिनी घरत, टीडब्ल्युजे फाउंडेशनचे सुमंत ठाकरे, रचना हजारे, जनसेवा फाउंडेशनचे रामचंद्र ढोबळे, भुषण ढोबळे, बी काइंडचे अभीजीत गुल्हाने, प्रसाद वाजपेयी यांनी सहकार्य केले.
*वनमंत्र्यांचे प्रसंगावधान*
वाघाडी नदीवरील जलपुजनाचा कार्यक्रम अन्य कार्यक्रमांच्या नंतर नियोजीत होता. मात्र अन्य कार्यक्रमांमध्ये विलंब होईल व सुर्यास्ताच्या पहिले जलपूजन करणे योग्य ठरविले. वनमंत्र्यांनी वाघाडीच्या कार्यक्रमाला प्रथम पोहोचुन कार्यक्रमातही प्राथमिकतेने जलपूजन आटोपत नारळ फोडुन जलजागृती मोहीमेचा श्रीगणेशा केला.


0 टिप्पण्या