Ticker

6/recent/ticker-posts

विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन.

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

नागपूर :-आमदार सौ. सरोज अहिरे यांचे कर्तृत्व आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी या कक्षाची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत. या कक्षासाठी एक डॉक्टर, दोन नर्स अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

हिरकणी कक्षाचे उद्घाटन आमदार सौ. सरोज अहिरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे , आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत , शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या