Ticker

6/recent/ticker-posts

मध्य रेल्वेने रचला इतिहास...


दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


मुंबई :- मध्य रेल्वेने विनातिकीट / अनधिकृत प्रवासाची ३२. ७७ लाख प्रकरणे शोधून काढली ज्यामुळे आर्थिक वर्ष २०२२-२३ ( एप्रिल नोव्हेंबर ) मध्ये रु . २१८ कोटींचा महसूल नोंदवता इतिहास रचला आहे . सर्व बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी , मध्य रेल्वे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय , मेल एक्सप्रेस , प्रवासी सेवा , विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करते . तिकीट तपासणीतील एप्रिल - नोव्हेंबर २०२२ या कालावधीतील रु . २१८ कोटींचा महसूल २०२१-२२ मधील याच कालावधीतील १२४. ६ ९ कोटींपेक्षा ७४. ८३ % अधिक कमाई केली आहे . भारतीय रेल्वेमध्ये तिकीट तपासणीतून नोंद झालेले २१८ कोटी रुपये आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत . मध्य रेल्वेचा २१८ कोटींचा महसूल केवळ ८ महिन्यांसाठी आहे , तर मध्य रेल्वेचा यापूर्वीचा सर्वाधिक रु . २१४. १४ कोटी महसूल संपूर्ण आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी होता . मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने विनातिकीट प्रवासाच्या धोक्याला आळा घालण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत . चार तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात एक कोटींहून अधिक महसूल गोळा करून उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे . के . के . पटेल हेड तिकीट परीक्षक , भुसावळ विभाग यांनी १२ , ०२४ प्रकरणांमधून रुपये १.०५ कोटी दंड वसूल केला .
विनय ओझा , सीटीआय , भुसावळ विभाग यांनी १२ , ९९ ० प्रकरणांमधून रु . १. ०२ कोटी दंड वसूल केला . आर एम गोरे , सीटीआय , मुख्यालय मुंबई यांनी ११ , ०२४ प्रकरणांमधून रु . १. ०० कोटी दंड वसूल केला . एस . एस . क्षीरसागर , मुख्य तिकीट परीक्षक पुणे विभाग यांनी १० , ७७१ प्रकरणांमधून रु . १.०२ कोटी दंड वसूल केला . प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या