दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
गडचिरोली :-पहांदी पारी कुपार गोंडी धर्म प्रचारक महासंघ कटेझरी , गोंडवाना गोंडी संस्कृती बचाव समिती परसवाडी व पोलिस स्टेशन पोटेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व आदिवासी सामूहिक विवाह सोहळा तसेच समाज प्रबोधन कार्यक्रम ३ व ४ डिसेंबरला गोटूल भूमी कटेझरी येथे आयोजित केला आहे . कोयापुनेम ध्वजारोहण विनायक मडावी यांच्या हस्ते होईल . संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गोंडी धर्म महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनिराम दुगा राहतील . उद्घाटन माजी आमदार हिरामन वरखडे यांच्या हस्ते होईल . मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक पाटील , चातगावचे सरपंच गोपाल उईके , नारायण सयाम , प्रमुख अतिथी म्हणून बी . डी . मडावी , मनोज पेंदाम , डॉ . मिलिंद नरोटे , गणेश हलामी , संदीप वरखडे , ममता हिचामी , दीपक सुरपाम , महेंद्र मडावी , ग्रामसेवक पिठाले उपस्थित राहतील . दोन्ही कार्यक्रमास समाजबांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन श्यामराव तुमरेटी , प्रतापशहा मडावी , मनोहर ईप्साम , जगदीश तुमरेटी , ज्ञानेश्वर कुमरे यांच्यासह गोटूल समितीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले .


0 टिप्पण्या